About Us
दिवा रेल्वे प्रवासी संघटना (स्थापना – १ ऑक्टोबर २००८)
ठाणे, डोंबिवली v इतर महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांप्रमाणे दिवा स्थानकात देखील सुखसुविधा मिळायला हव्या हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेऊन दैनंदिन प्रवास करणाऱ्या आणि समाजसेवेची आवड असणाऱ्या सहकाऱ्यांना घेऊन रेल्वे प्रवासी संघटना स्थापन झाली. सन १९६७ साली उभारणी झालेल्या दिवा स्थानकाला जंक्शनचा दर्जा, कोंकणात जाणाऱ्या गाड्या, वसई, पनवेल, कर्जत, कसारा व मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या जरी सुटत असल्या तरी मूलभूत सुखसुवीधांपासून कायम वंचित दिवा स्थानकासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा आणि वेळप्रसंगी आक्रमक व रोखठोक भूमिका घेणे गरजचे होते. संघटनेच्या स्थापनेनंतर १६ वर्षात दिवा रेल्वे स्थानकात अमुलाग्र बदल झाले किंबहुना प्रवासी संघटनेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ते शक्य झाले आहे.
About Us
DIVA RAILWAY PRAVASI SANGHATANA…Read More
Useful Links
Our Work
Get In Touch
Diva(E)
Email : 123@gmail.com
Mobile : +91 123456789